सांगली जिल्ह्यात 13 डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालत
schedule18 Nov 25 person by visibility 82 categoryसांगली
सांगली प्रतिनिधी - राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार शनिवार, दि. 13 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये पक्षकारांनी आपली जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून तडजोडीने मिटविण्याबाबत लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी केले आहे.