Breaking : bolt
आरोग्यचे आयुक्त अँक्शनमोडवर, मनपाचे आरोग्य अधिकारी यांची बदली आणि चौकशीचे आदेशडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलंच पत्रकारी स्वरूपाचं लेखन 'मूकनायक'च्या पहिल्या अंकात....'मॅनेज' निविदेचा प्लॅन उधळला ? आता दोषींच्या चौकशीअंती निलंबनाची मागणी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण असताना धाराशिवमध्ये बोगस औषधे पोहचली कशी ?आयपीएस अधिकाऱ्या विरोधात महिला डॉक्टरने दाखल केला बलात्काराचा गुन्हाबोगस डॉक्टरांकडे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियंत्रण समितीचे दुर्लक्ष रुग्णांच्या जीवावर ?दिनांक १३ एप्रिल ते १९ एप्रिल २०२५ चे साप्ताहिक राशिभविष्यपुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यात सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा महसूल जमालातूर जिल्ह्यात येणार २ हजार २६८ कोटींची गुंतवणूकसिंधुदुर्गमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जाहिरात

 

युतीधर्म पाळत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये रासप पक्ष करणार महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा प्रचार

schedule26 Apr 24 person by visibility 251 categoryइतर

जमीर शेख (सिंधुदुर्ग) - महाराष्ट्र राज्यात महायुतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी देऊन आमच्या पक्षाचा सन्मान केला त्याबद्दल महायुतीचे सर्व नेत्यांचे कोकण विभाग प्रसिध्दी प्रमुख सुशांत पोवार आणि  उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आभार मानले. कोकणचा सर्वांगीण विकास आदरणीय नारायण राणे साहेब यांच्या माध्यमातूनच झाला आहे आणि त्यांनीच या कोकणाला सावरले आहे त्यामुळे युती धर्म पाळत आम्ही सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी राणे साहेबांचा ग्राउंड लेव्हलला जाऊन प्रचार करणार व त्यांच्या मताधिक्यामध्ये खारीचा वाटा उचलण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्ये प्रयत्न करेल असा विश्वास सुशांत पोवार आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांना दिला. आमदार नितेश राणे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या काळात आपले सर्व प्रश्न मार्गी लागतील तुम्ही आमच्या संपर्कात कायमस्वरूपी रहा निवडणुकीपुरते संपर्कात न राहता इतर वेळी सुद्धा आपण आमच्या संपर्कात राहिला तर आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या समाज बांधवांना निधी स्वरूपात मदत करून विकसित सिंधुदुर्ग रत्नागिरी करण्यासाठी प्रयत्नशील राहू आणि आपल्याला बळ देण्याचे काम देखील आमच्या माध्यमातून होईल आपण एकदिलाने काम करावं आणि तुम्ही ते कराल असं विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. नवलराज काळे यांच्या माध्यमातून समाजाचे बरेचसे प्रश्न मार्गी लावले असून पुढील येणाऱ्या काळामध्ये तुम्हा सर्वांना एकत्र करून तुमच्या सर्व प्रश्नांवरती लक्ष देऊ असा शब्द आमदार नितेश राणे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला.
                  यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी सिमंतिनी मयेकर (कोकण विभाग महिला आघाडी अध्यक्षा) सुशांत पोवार (कोकण विभाग प्रसिद्धी प्रमुख) उज्वला येळावीकर (सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा)
युवराज खराडे (सिंधुदुर्ग विधानसभा अध्यक्ष) आणि तन्मय राणे (जिल्हा कार्यकारी सदस्य) उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes