Breaking : bolt
पक्षांतर प्रकरणातील न्याय निर्णयांवर ठाकरे गटाचा संतापसुनील तटकरे यांच्या रणनीतीमुळे रायगडमध्ये शिवसेनेला धक्का, राजीव साबळे राष्ट्रवादीत दाखलफडणवीस राज्यपालांची भेट घेऊन नवीन धक्का देण्याच्या तयारीत, राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठी घडामोड घडते याचे स्पष्ट संकेतबीएसएनएल कंपनीच्या मोबाईल टॉवरची लाईट गेल्यास रेंज गायबदापोलीतून "एक राखी जवानांसाठी" अभियानाअंतर्गत सीमेवर राख्या रवाना !महाराष्ट्रात निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्यामागे राज - उद्धव युतीच्या घबराटीचं सावट ?अंबानींंच्या बदनामीसाठीचं सीईओ कोल्हापुरात, त्यांचा अटीट्युड आणि एवढी पण भीती बरोबर नाही !समृद्धी महामार्गातील हजारो झाडांच्या कत्तलीत लाखो पशु-पक्षी रस्त्यावर आली, तेव्हा "पेटा" कुठे होती ?वैभववाडी येथील राज्य महामार्गावरील चिखलमय खड्ड्यात फुलणार "आंदोलनाची" हिरवीगार झाडेसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिरोडा येथील विद्युत पोलवर तागंठी तलवार

जाहिरात

 

फिटनेससाठी लाइफस्टाइलमध्ये कोणते बदल करणं ठरेल लाभदायक ? जाणून घ्या

schedule24 Oct 24 person by visibility 364 categoryआयुर्वेद

व्यायामाला पर्याय नाही
व्यायामाला शॉर्टकट नसतो. व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही अशी तक्रार बरेच जण करतात. कमी वेळेत जास्तीत जास्त शारीरिक हालचाल करण्यासाठी एचआयआयटी वर्कआउट तुम्हाला नक्कीच मदत करेल. एका संशोधनाअंती सिद्ध झालं आहे की, आठवड्यातून तीन वेळा दहा मिनिटांसाठी एचआयआयटी व्यायाम केल्यास फायदेशीर ठरू शकतं.
सकस आहार आवश्यक
उत्तम आरोग्यासाठी पोषक आहाराचं सेवन करणं आवश्यक आहे. शरीराच्या वाढीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या घटकांचं सेवन करणं आवश्यक आहे. यासोबतच शरीरात गेलेल्या पोषणद्रव्यांचं योग्य प्रकारे पचन होणंही तितकंच गरजेचं आहे. 'क' जीवनसत्व शरीरातील लोहाचं पचन होण्यासाठी मदत करतं. लोहयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर 'क' जीवनसत्व भरपूर प्रमाणात असणाऱ्या संत्र्याच्या रसाचं सेवन करावं. चरबीयुक्त पदार्थांचं विघटन करण्यासाठी 'अ', 'ड', 'इ' आणि 'क' जीवनसत्व मदत करतात. म्हणूनच आहारतज्ज्ञ जेवणात तेलाचं ड्रेसिंग असणारी कोशिंबीर आणि फळं खाण्याचा सल्ला देतात.
श्वसनक्रिया सुरळीत होण्यासाठी
पोटाचे व्यायाम केल्यानं पोटाच्या स्नायूंसोबतच फुफ्फुसांचंही आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळते. पोटाचे व्यायाम करताना दीर्घ श्वास घेतला जातो, ज्याचा फुफ्फुसांना फायदा होतो. श्वसनाचे विकार असणाऱ्यांसाठी योग करणं फायद्याचं ठरू शकतं. श्वसनाचे व्यायाम केल्यानं रक्तातील ऑक्सिजनची पातळी व्यवस्थित राहते. शिवाय रक्तदाब आणि हृदयाचे ठोके नियंत्रित राहण्यासाठी मदत होते.
स्क्रीनटाइमवर असावं नियंत्रण
अतिरिक्त स्क्रीनटाइम डोळ्यांच्या आजारांना आमंत्रण देऊ शकतं. दिवसभरात इतर व्यायामासोबतच डोळ्यांचे सुद्धा व्यायाम करणं आवश्यक आहे. डोकेदुखीची समस्या सतावणाऱ्या लोकांनी डोळ्यांचे नियमित व्यायाम करायला हवे. यासोबतच डोळ्यांना ताण जाणवत असल्यास डोळे काही सेकंदासाठी बंद करा अथवा हिरवळीकडे बघा. दीर्घकाळ बसून राहणं वृद्धत्वाला आमंत्रण देऊ शकतं, असं एका संशोधनातून सिद्ध झालं आहे. ऑफिसमध्ये काम करताना आपण किती वेळ बसून राहतो हे मोजता येणं अशक्य आहे. बसून काम करताना प्रत्येक तीस मिनिटांनी उभं राहून शरीराची हालचाल केल्यास संभाव्य धोके टाळता येऊ शकतात, असं कोलंबिया युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ नमूद करतात.

Nutritionist & Dietitian Naturopathist
Dr.Amit Bhorkar

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes