Breaking : bolt
पक्षांतर प्रकरणातील न्याय निर्णयांवर ठाकरे गटाचा संतापसुनील तटकरे यांच्या रणनीतीमुळे रायगडमध्ये शिवसेनेला धक्का, राजीव साबळे राष्ट्रवादीत दाखलफडणवीस राज्यपालांची भेट घेऊन नवीन धक्का देण्याच्या तयारीत, राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठी घडामोड घडते याचे स्पष्ट संकेतबीएसएनएल कंपनीच्या मोबाईल टॉवरची लाईट गेल्यास रेंज गायबदापोलीतून "एक राखी जवानांसाठी" अभियानाअंतर्गत सीमेवर राख्या रवाना !महाराष्ट्रात निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्यामागे राज - उद्धव युतीच्या घबराटीचं सावट ?अंबानींंच्या बदनामीसाठीचं सीईओ कोल्हापुरात, त्यांचा अटीट्युड आणि एवढी पण भीती बरोबर नाही !समृद्धी महामार्गातील हजारो झाडांच्या कत्तलीत लाखो पशु-पक्षी रस्त्यावर आली, तेव्हा "पेटा" कुठे होती ?वैभववाडी येथील राज्य महामार्गावरील चिखलमय खड्ड्यात फुलणार "आंदोलनाची" हिरवीगार झाडेसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिरोडा येथील विद्युत पोलवर तागंठी तलवार

जाहिरात

 

बांधकाम परवाना मिळत नसल्याने विकासकाचा आत्मदहनाचा इशारा!

schedule26 Jul 25 person by visibility 53 categoryक्राइम न्यूज

संजय पोवार - वाईकर (कोल्हापूर) - सध्या कोल्हापूर महानगरपालिका राज्यात गाजत असून टक्केवारीच्या आरोपाने कोल्हापूर बदनाम झाले आहे. महानगरपलिकेचा नगरारचना विभाग तर अधिकारी कमी आणि एजंटांनी भरलेला असतो. कोल्हापूर महानगरपालिकेचा नगरारचना विभागात तर भलताच प्रकार समोर आला असून प्रशासक मंजूलक्ष्मी यांचा अधिकाऱ्यांवरील दुर्लक्षमुळे हे अधिकारी नागरिकांच्या बांधकामांच्या परवानगीच्यासह इतर कामे एजंटविना फाईल चार चार महिने परवानगी मिळत नसल्याने "ग्रामीण भागातीलचं परवानग्या बऱ्या" असे नागरिक बोलत आहेत. शाहूपुरीतील एका बांधकाम परवानगीची फाईल एक नागरिक अनेक महिने फेऱ्या मारून पण होत नसल्याने ज्या अधिकाऱ्याने फाईलची अडवणूक केली त्या अधिकाऱ्याने केलेल्या गैरव्यवहाराची महत्वाच्या फाईलसह राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर आत्मदाहानाचा इशारा दिला आहे. ही फाईल समोर आली तर अनेक अधिकारी गजाआड जाऊ शकतात तसेच ह्या फाईलने राजकीय वातावरण तापू शकते असे अनेक मनपा अधिकारी दाबक्या आवाजात बोलत आहेत.
       कोल्हापूर महानगरपालिका भ्रष्टाचाराच्या टक्केवारीने किती खोलवर बरबटलेली आहे याची चर्चा वारंवार होत राहिली. मात्र याबाबत लेखी काहीच समोर काही येत नसल्याने फक्त आरोप होत राहिल्याने आरोपांचा फक्त धुरळा होत राहिल. मात्र, कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या कंत्राटदराने समोर येत अगदी आयुक्तांपासून ते क्लार्कपर्यंत किती टक्केप्रमाणे किती रुपये दिले याचीच पोलखोल करणारी यादी सादर केली आहेत. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेसह कोल्हापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापूर महापालिकेमध्ये कामे न करता ८५ लाखांचे बिल उचलले असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे संघटक सत्यजित कदम यांनी केल्यानंतर आता आपण कंत्राटदाराने समोर येत आपण आरोप फेटाळून आपण काम केलं असल्याचं म्हटलं आहे. कोणाला किती टक्केवारी दिली याची यादीच ठेकेदार श्रीप्रसाद संजय वराळे (रा. घर नंबर ७००, आंबेडकर नगर, कसबा बावडा, कोल्हापूर) यांनी निवेदनातून दिली आहे. वराळे यांनी स्वतः वृत्तपत्र कार्यालयांमध्ये येऊन निवेदन दिलं आहे त्यांनी या निवेदनाचा मेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महापालिका प्रशासक, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग पुणे, पोलीस अधीक्षक यांना सुद्धा दिला असल्याची माहिती दिली. वराळे यांनी कसबा बावड्यातील ड्रेनेजचे काम न करता ८५ लाख रुपयांची बिले उचलल्याचा आरोप सत्यजित कदम यांनी केल्यानंतर वराळे यांनी थेट टक्केवारीसह कामाची यादी दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes