सामाजिक कार्यकर्ते जयराज कोळी आणि युवराज खराडे यांना खंडणी प्रकरणी अटक
schedule24 Jun 25
person by
visibility 70
categoryक्राइम न्यूज
संजय पोवार (वाईकर) - सामाजिक कार्यकर्त्याच्या मुखवट्याआड खंडणीचा गोरखधंदा करणाऱ्या जयराज कोळीला पोलिसांनी 15 लाखांची खंडणी घेताना रंगेहात अटक केली आहे. औषधी उपकरणांच्या पुरवठादाराकडून खोट्या चौकशी अर्जाच्या आधारे ब्लॅकमेल करून ही रक्कम उकळण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि कागल पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जयराज कोळी आणि त्याचा साथीदार युवराज खराडे यांना अटक केली. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, जयराज कोळीने "खंडणी द्या, अन्यथा तुझ्या पत्नीच्या नावाने खोटे चौकशीचे अर्ज टाकून त्रास देण्याची धमकी दिली होती.
स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता जयराज कोळी यांना 15 लाखाची खंडणी घेताना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. जयराज कोळी बरोबरच त्याचा साथीदार युवराज खराडेला देखील पोलिसांनी अटक केली.औषधी उपकरणे पुरवठा करणाऱ्या एका व्यक्तीला जयराज कोळी चौकशीचे खोटे अर्ज दाखल करून वारंवार त्रास देत होता. यानंतर मी सगळे अर्ज मागे घेतो मात्र 20 लाख रुपये दे अशी मागणी जयराज कोळी यांने केली... शेवटी 15 लाखावर तडजोड झाली आणि कागलच्या लक्ष्मी टेकडीच्या जवळ हे पैसे देण्याचे ठरले. फिर्यादीने आधीच या संदर्भातली माहिती पोलिसांना दिली होती. त्यामुळे सापळा रचून पोलिसांनी जयराज कोळी आणि युवराज खराडेला पकडले. या दोघांवर देखील कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सामाजिक कार्याच्या नावाखाली जयराज कोळी याने ब्लॅकमेलिंगचा धंदा सुरू केला होता. सीपीआर मध्ये माहिती अधिकाराचे अर्ज टाकून संबंधित व्यक्तींना त्रास देत पैशाची मागणी केली जात असे. मात्र या प्रकरणात जयराज कोळी याचे कारनामे समोर आले. जयराज कोळी हा पूर्वी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा पदाधिकारी होता.मात्र त्याचे हे कारनामे बघून प्रहार संघटनेमधून त्याचे हकलपट्टी करण्यात आली.
जयराज कोळीने सामाजिक कार्याचा मुखवटा घालून सीपीआर रुग्णालयासह विविध ठिकाणी माहिती अधिकाराचे (RTI) अर्ज टाकून ब्लॅकमेलिंग सुरू केली होती. त्याच पद्धतीने औषधी उपकरण पुरवठादाराकडून खंडणी मागण्यात आली होती. 15 लाख रुपये रोख स्वरूपात घेताना पोलिसांनी सापळा रचून आरोपींना पकडलं. कोळीविरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. खंडणी, धमकी आणि खोट्या चौकशांची भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्रकार त्याने वेळोवेळी केला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आणखी कोणत्या व्यापाऱ्यांना किंवा व्यक्तींना कोळीने टार्गेट केलं होतं, याची माहिती घेत आहेत.