Breaking : bolt
पक्षांतर प्रकरणातील न्याय निर्णयांवर ठाकरे गटाचा संतापसुनील तटकरे यांच्या रणनीतीमुळे रायगडमध्ये शिवसेनेला धक्का, राजीव साबळे राष्ट्रवादीत दाखलफडणवीस राज्यपालांची भेट घेऊन नवीन धक्का देण्याच्या तयारीत, राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठी घडामोड घडते याचे स्पष्ट संकेतबीएसएनएल कंपनीच्या मोबाईल टॉवरची लाईट गेल्यास रेंज गायबदापोलीतून "एक राखी जवानांसाठी" अभियानाअंतर्गत सीमेवर राख्या रवाना !महाराष्ट्रात निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्यामागे राज - उद्धव युतीच्या घबराटीचं सावट ?अंबानींंच्या बदनामीसाठीचं सीईओ कोल्हापुरात, त्यांचा अटीट्युड आणि एवढी पण भीती बरोबर नाही !समृद्धी महामार्गातील हजारो झाडांच्या कत्तलीत लाखो पशु-पक्षी रस्त्यावर आली, तेव्हा "पेटा" कुठे होती ?वैभववाडी येथील राज्य महामार्गावरील चिखलमय खड्ड्यात फुलणार "आंदोलनाची" हिरवीगार झाडेसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिरोडा येथील विद्युत पोलवर तागंठी तलवार

जाहिरात

 

अपचन-आंबट ढेकर, गॅसेसचा त्रास होतो ? जेवताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, पोट फुगण्याचा होणार नाही त्रास

schedule16 Jul 24 person by visibility 260 categoryआयुर्वेद

डॉ.प्रमोद ढेरे (निसर्ग उपचार तज्ञ) - सध्याच्या काळात लोकांच्या खाण्या पिण्याच्या सवयी पूर्णपणे बदलत चालल्या आहे. वेळेचा अभाव, योग्य आहार न खाणे, प्रत्येक वेळेस उलट सुलट खाणे, तळकट मसालेदार पदार्थांमुळे पचन तर बिघडतेच, शिवाय वजन यासह इतर गंभीर आजार निर्माण होतात. ज्यामुळे आरोग्य बिघडते.
         मुख्य म्हणजे बद्धकोष्ठता, गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणे या त्रासामुळे दिवसभर कामात लक्ष लागत नाही, व खाल्लेलं अन्नही लवकर पचत नाही. पोटाचे विकार आपल्याला छळू नये, यासाठी खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या, खाता पिताना कोणती विशेष काळजी घायायला हवी, जेणेकरून पोटाचा त्रास होणार नाही, पाहूयात
अपचन होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्याल ?
पाणी पिणे : जेवण करण्याच्या ३० मिनिटाआधी नेहमी पाणी प्या, उत्तम आरोग्यासाठी शरीर नेहमी हायड्रेट ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण अशा स्थितीत पचनासह शरीराची सर्व कार्ये व्यवस्थित चालतात. आपण दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. शिवाय असे पदार्थ खा ज्यात पाण्याचे प्रमाण जास्त असेल.

आलं : आहारात आल्याचा समावेश केल्याने अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. पदार्थात आल्याचा समावेश केल्याने पचनक्रिया मजबूत होते आणि शरीरातील आजारही दूर होतात. आपण कच्चे आले चघळू शकता किंवा आल्याचा चहा, आले पाणी, आले कँडी खाऊ शकता.

दही : आपण दही कोणत्याही ऋतूत खाऊ शकता. दही हे एक प्रोबायोटिक फूड आहे. दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया मुबलक प्रमाणात आढळतात. ज्यामुळे पचनक्रियेत कोणतीही अडचण येत नाही. आहारात दह्याचा समावेश केल्याने पोट थंड राहते, शिवाय अन्नही लवकर पचते. आपण दही जेवण करताना किंवा जेवणानंतरही खाऊ शकता.

शतपावली : जेवल्यानंतर काहींना लगेच झोपण्याची सवय असते. पण ही सवय वेळीच टाळा. जेवल्यानंतर शतपावली करा, निदान १० ते १५ मिनिटं शतपावली करणं गरजेचं आहे. यामुळे अन्न पचण्यास मदत होते आणि नंतर बद्धकोष्ठता किंवा गॅसेससारखा त्रास होत नाही.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes