एपीटी ॲप्लिकेशन प्रणालीसाठी 4 ऑगस्टला पोस्टल व्यवहार बंद
schedule01 Aug 25 person by visibility 25 categoryसांगली

संजय तोडकर (सांगली) - डाक विभागात एपीटी अॅप्लिकेशन ही सुधारित प्रणाली सांगली व मिरज मुख्य डाकघर आणि त्याअंतर्गत येणाऱ्या उपडाकघरांमध्ये तसेच शाखा डाकघरांमध्ये दि. 5 ऑगस्ट 2025 रोजी लागू करण्यात येणार आहे. या प्रगत डिजीटल प्लॅटफॉर्मकडे सुरळीत आणि सुरक्षित संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी नियोजित डाऊनटाईम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या दिवशी कोणतेही पोस्टल व्यवहार पोस्ट ऑफिसमध्ये होणार नाहीत. असे प्रवर अधीक्षक डाकघर सांगली यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.