Breaking : bolt
गैरप्रकार बाहेर येऊ नये म्हणून लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चार्ज काढून घेतले जातील अशी दबक्या आवाजात चर्चा ? शंका खरी ठरल्यास राज्याचे लक्ष कोल्हापूरवर केंद्रित होण्याची शक्यता...?सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत मोठी कारवाई, वरिष्ठ अधिकारी निलंबित....अमराठी औषध पुरवठादारांकडून झटपट पैसे कमविण्याच्या हव्यासापोठी कोल्हापुरचंं आरोग्य बिघडविण्याचा प्रयत्न....राजकीय दबावापोटी मनापाचा जैव वैद्यकीय प्रकल्प बंद पाडून खाजगी प्रकल्प टाकण्याचा डाव अखेर यशस्वी, मनपाच्या उत्पन्नाचा एक स्त्रोत झाला कमीसंस्कृती बचाव मोर्चाने सांगलीतील तीन घराण्यांचे गणित जुळून आले तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकतेकाही नेत्यांच्या राजकीय अपरिपक्वतेमुळे जयंत पाटील - बाळासाहेब थोरात ठरले महाराष्ट्रात नंबर एकचे नेते....बनावट औषध पुरवठा प्रकरण बाहेर येऊ नये म्हणूनचंं तर झाले नसेल औषध निर्माण अधिकाऱ्याचंं निलंबन ?गणपती व आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील मानव गवंडी टोळी हद्दपारसंजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील सागर लोखंडे टोळी हद्दपार; सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात २ वर्षे प्रतिबंधितमुल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने दाम्पत्याची फसवणूक, दागिने चोरी करणारा संशयित जेरबंद

जाहिरात

 

कागल तालुका आरोग्य विभागाचा महाराष्ट्र शासनाकडून गौरव

schedule15 Aug 25 person by visibility 316 categoryकोल्हापूर

अंजुम देसाई (कोल्हापूर) -  महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम अंतर्गत राज्यातील विविध शासकीय कार्यालयांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे. या अत्यंत प्रतिष्ठित मोहीमेमध्ये कागल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फारूक अहमद देसाई यांना तालुका वैद्यकीय अधिकारी गटातून राज्यात द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले असून, कागल तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाच्या यशासाठी प्रशस्तीपत्रक देण्यात आले आहे.

                  सदरची मोहीम राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील विविध विभागात एकूण १२,५०० शासकीय कार्यालयांमध्ये यशस्वीपणे राबवली गेली असून, यामुळे सरकारी यंत्रणेतील कामकाजात सुधारणा झाली आहे तसेच कागलतर्फे वैद्यकीय सेवांमध्ये चांगली प्रगती नोंदविण्यात आली आहे. या शंभर दिवसांच्या विशेष मोहीम अंतर्गत घेतलेल्या सुधारणा व सुधारित प्रशासनासाठी प्रशस्तीपत्रकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सही असून, या प्रशस्तीपत्रकाने कागल तालुका आरोग्य विभागाच्या अभिमानात मनाचा तुरा रोवला गेला आहे.

              कागल तालुका आरोग्य कार्यालयाच्या या उल्लेखनीय कार्याला जिल्ह्यातून अभिमान व्यक्त होत असून डॉ. फारूक अहमद देसाई यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी कागलवासियांसाठी आरोग्यसेवा सुधारण्यासाठी केलेले कठोर परिश्रम, वेळोवेळी प्रशासनात केलेले सुधारणात्मक उपाय व कार्यक्षमतेने योजनांची केलेली अंमलबजावणी करण्याचा त्यांचा दृष्टिकोन यामुळे हा मान कागल तालुक्याला मिळाला आहे. या शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम अंतर्गत कार्यालयीन प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, वेग व कार्यक्षमतेत सुधारणा करून शासनाच्या धोरणांना अधिक प्रभावीपणे राबविण्यावर भर होता. कागल तालुका आरोग्य कार्यालयाने या सर्व बाबतीत आदर्श घालून इतर कार्यालयांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

             महाराष्ट्र शासनाच्या या अत्यंत महत्त्वाच्या मोहीमेत कागल तालुका आरोग्य विभागाला द्वितीय क्रमांक मिळाला हा गौरव शासनाच्या कार्यकुशलतेतील प्रगतीचा तसेच कागलच्या आरोग्यसेवेत होणाऱ्या सकारात्मक बदलांचा संकेत आहे. यामुळे तालुक्यातील आरोग्यसेवा अधिक सुलभ, जलद व गुणवत्तापूर्ण होण्याच्या दिशेने पाउल पडत असल्याचे संकेत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes