सांगलीमधील जीन्स कापड उद्योगादाराची फसवणूक, गुन्हा दाखल
schedule28 Jul 25
person by
visibility 50
categoryसांगली
संजय तोडकर (सांगली) - सांगली जिल्ह्यात व्यापार फसवणुकीचा गंभीर गुन्हा एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी ममता राजेंद्रकुमार बाफना यांनी आरोपी सागर नारायणदास केशवानी यांच्यावर तब्बल 19,64,401/- रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे. ही घटना 27 जानेवारी 2023 ते 11 एप्रिल 2023 दरम्यान सांगलीतील माधवनगर येथे इंडोटेक्स एक्सपोर्ट्स या फर्मशी संबंधित आहे.
फीर्यादी ममता बाफनाचा आरोप आहे की आरोपी सागर केशवानी यांनी इंडोटेक्स एक्सपोर्ट्स फर्मकडून जीन्स कापडाची ऑर्डर घेतली. त्यानंतर 27,29,862/- रुपये किंमतीच्या ऑर्डरपैकी 7,65,461/- रुपयांची काही रक्कम देऊन, उर्वरित रक्कम 19,64,401/- रुपये परत न करता विश्वासघात आणि फसवणूक केली. या प्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात भादवी कलम 420 (फसवणूक) व 406 (विश्वासघात) अंतर्गत गुन्हा २५ जुलै २०२५ रोजी नोंदवण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी सागर केशवानी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटना इंडो टॅक्स एक्सपोर्ट्स गट नंबर 23, संजय इंडस्ट्रीज, माधवनगर, मिरज येथे घडली असून तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ या फसवणुकीची प्रक्रिया चालू होती. फिर्यादीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या विश्वासाचा गैरफायदा घेत फसवणूक केल्याचे सिद्ध झाले आहे.