Breaking : bolt
पक्षांतर प्रकरणातील न्याय निर्णयांवर ठाकरे गटाचा संतापसुनील तटकरे यांच्या रणनीतीमुळे रायगडमध्ये शिवसेनेला धक्का, राजीव साबळे राष्ट्रवादीत दाखलफडणवीस राज्यपालांची भेट घेऊन नवीन धक्का देण्याच्या तयारीत, राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठी घडामोड घडते याचे स्पष्ट संकेतबीएसएनएल कंपनीच्या मोबाईल टॉवरची लाईट गेल्यास रेंज गायबदापोलीतून "एक राखी जवानांसाठी" अभियानाअंतर्गत सीमेवर राख्या रवाना !महाराष्ट्रात निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्यामागे राज - उद्धव युतीच्या घबराटीचं सावट ?अंबानींंच्या बदनामीसाठीचं सीईओ कोल्हापुरात, त्यांचा अटीट्युड आणि एवढी पण भीती बरोबर नाही !समृद्धी महामार्गातील हजारो झाडांच्या कत्तलीत लाखो पशु-पक्षी रस्त्यावर आली, तेव्हा "पेटा" कुठे होती ?वैभववाडी येथील राज्य महामार्गावरील चिखलमय खड्ड्यात फुलणार "आंदोलनाची" हिरवीगार झाडेसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिरोडा येथील विद्युत पोलवर तागंठी तलवार

जाहिरात

 

पीएम श्री आदर्श केंद्र शाळा कान्हे याठिकाणी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा.....

schedule17 Mar 25 person by visibility 209 categoryपुणे

आरती भाळवणे (पुणे प्रतिनिधी) - पीएम श्री आदर्श शाळा कान्हे येथे बुधवार दि. १२ मार्च रोजी शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्यकुशल सदस्या आरतीताई भाळवणे आणि स्वप्नालीताई आरोटे यांच्या प्रयत्नातून व कान्हे शाळेच्या मुख्याध्यापिका सुकेशिनी कोले यांचे मार्गदर्शनातुन महिला दिनाचे आयोजन करण्यात आले. सदर महिला दिनी शाळेतील सर्व वर्गातील विद्यार्थीनी आणि महिला शिक्षिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता.
           शनिवार दि.८ मार्च रोजी शनिवार असल्यामुळे "आनंद दायी शनिवार" हा उपक्रम आणि "महिला दिन" एकत्र आल्यामुळे सर्वाच्या आनंदात भर पडली. शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्यांनी मुलींसाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करुन प्रत्येक वर्गासाठी बक्षिसे जाहीर केलेली होती.
शाळेतील सर्व वर्गातील विद्यार्थीनींनी यात सहभाग घेऊन जगभरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षैत्रात आदर्शवत काम करून आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविणा-या महिलांचे वेश धारण करुन राजमाता जिजाऊ, आहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सिंधूताई सपकाळ, मदर तेरेसा, सुनिता विल्यम्स, इंदिरा गांधी यांचे जीवनावर आधारीत भाषणे करुन आदर्श महिलांचा इतिहासच उभा केला.
             शाळेतील सर्व आदर्श महिला शिक्षिका तसेच सर्व विद्यार्थीनी आणि शाळा व्यवस्थापन समितीतील महिलांना यानिमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या. पोळ यांनी परीक्षण करून नंबर काढले सदर कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थीनींना शाळेच्या मुख्याध्यापिका सुकेशिनी कोले, सहशिक्षक जगदाळे, नवले, सांगळे, खरात शिक्षकांसह महिला शिक्षिका अंब्रुळे, गाढवे, कांबळे, मधे, वाव्हळ, केदारलिंगे, बारवे, रणदिवे, पोळ यांचे शुभहस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या आनंदाने या कार्यक्रमात सहभागी झालेले होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes