Breaking : bolt
पक्षांतर प्रकरणातील न्याय निर्णयांवर ठाकरे गटाचा संतापसुनील तटकरे यांच्या रणनीतीमुळे रायगडमध्ये शिवसेनेला धक्का, राजीव साबळे राष्ट्रवादीत दाखलफडणवीस राज्यपालांची भेट घेऊन नवीन धक्का देण्याच्या तयारीत, राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठी घडामोड घडते याचे स्पष्ट संकेतबीएसएनएल कंपनीच्या मोबाईल टॉवरची लाईट गेल्यास रेंज गायबदापोलीतून "एक राखी जवानांसाठी" अभियानाअंतर्गत सीमेवर राख्या रवाना !महाराष्ट्रात निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्यामागे राज - उद्धव युतीच्या घबराटीचं सावट ?अंबानींंच्या बदनामीसाठीचं सीईओ कोल्हापुरात, त्यांचा अटीट्युड आणि एवढी पण भीती बरोबर नाही !समृद्धी महामार्गातील हजारो झाडांच्या कत्तलीत लाखो पशु-पक्षी रस्त्यावर आली, तेव्हा "पेटा" कुठे होती ?वैभववाडी येथील राज्य महामार्गावरील चिखलमय खड्ड्यात फुलणार "आंदोलनाची" हिरवीगार झाडेसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिरोडा येथील विद्युत पोलवर तागंठी तलवार

जाहिरात

 

लातूरमध्ये प्रजासत्ताक दिनी मुकबधिर विद्यार्थ्यांचे तालबध्द संचलन पहिल्याच प्रयोगात 64 दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिली राष्ट्रध्वजाला सलामी

schedule27 Jan 25 person by visibility 194 categoryलातूर

सचिन तळेकर (लातूर) - श्रवण दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांनी रविवारी क्रीडा संकुल येथे झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात हिरीरीने सहभाग घेत सामान्यांनानाही लाजवेल असे संचलन केले. बँड पथकाच्या कंपाचा आधार घेत राष्ट्रध्वजाला सलामी दिली. राज्यातील दिव्यांगासाठीच्या हा पहिलाच प्रयोग असला तरी या विद्यार्थ्यांनी उपस्थितींची मने जिंकली.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी क्रीडा संकुलाच्या मैदानावर मुख्य ध्वजारोहण झाले. यावेळी विविध पथकांचे संचलन झाले. यामध्ये प्रथमताच दिव्यांग विद्यार्थ्यांनी भाग घेत ‘हम भी कुछ कम नहीं’ हे दाखवून दिले. शहरातील ॲड. विजयगोपाल अग्रवाल मुकबधीर विद्यालय व सौ. सुशिलादेवी देशमुख मुलींचे निवासी मुकबधीर विद्यालयातील 64 जणांच्या पथकाने शानदार संचलन करीत उपस्थितांचे लक्ष वेधले. मुलांच्या तुकडीचे नेतृत्व प्रवीण दावलबाजे या विद्यार्थ्यांने तर मुलींच्या तुकडीचे नेतृत्व आदिती यादव हिने केले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी या विद्यार्थ्यांना संचालनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले.

समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग लातूर विभागात राबविण्यात येत आला. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, स्काऊट गाईडचे जिल्हा संघटक डॉ. शंकर चामे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता राजु गायकवाड, सहायक सल्लागार बाळासाहेब वाकडे, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग कार्यालयातील लिपीक प्रमोद शिंदे, स्काऊट गाईडचे प्रमुख संघटक महेश पाळणे, क्रीडा शिक्षक प्रशांत कुलकर्णी, नंदकुमार थडकर, नामदेव भालेकर, विशेष शिक्षक प्रवीण कदम, रामेश्वर गवरे, सिंधू इंगळे, मीरा परजणे यांनी परिश्रम घेतले.

पालकमंत्र्यांनीही केले कौतुक

सामान्यांसोबत दिव्यांग विद्यार्थीही या संचलनात हिरीरीने भाग घेतल्याने पालकमंत्री यांनी या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. क्रीडा संकुलात ध्वजारोहणावेळी उपस्थित नागरिकांनीही या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संचलन कलेला भरभरून प्रतिसाद दिला.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes