सुशांत पोवार (विशेष वृत्त) - एका हत्तीनीसाठी अखखा कोल्हापूर जिल्हा हळहळतो आहे. तिच्या निरोपाच्या वेळी सगळे भाऊक होऊन अनेकांच्या डोळ्यात अश्रूही आले. तीन दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये दिसलेल हे चित्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातलं नांदणी गाव, या गावच्या जैन मठामध्ये असलेली माधुरी उर्फ महादेवी हत्तीन गेल्या 33 वर्षांपासून ही हत्तीन इथे वास्तव्यास होती. नुकतच या हत्तीला गुजरातच्या जामनगर इथं असलेल्या रिलायन्स फाऊंडेशनच्या वनतारा या संगोपन केंद्रामध्ये नेण्यात आलं. यामुळं कोल्हापूरकरांच्या भावना अनावर झाल्या आहेत. या हत्तीला आपल्याजवळ ठेवण्यासाठी इथल्या ग्रामस्थांनी अनेक प्रयत्न केले. सर्वोच्च न्यायालयापर्यंत याचिका दाखल केली. पण याचा काहीच फायदा झाला नाही. ही हत्तीन वनतारा इथे गेल्यानंतर आता इथल्या ग्रामस्थांनी थेट रिलायन्स जिओच्या सिम कार्डला टार्गेट करणं सुरू केलय. कोल्हापूरमध्ये सध्या बॉयकॉट जिओचा ट्रेंड आलाय. हे सगळं होतय ते एका हत्तीनीसाठी पण हत्तीनीसाठी कोल्हापूरकर एवढे भाऊ का झालेत, या हत्तीनीसाठी जैन समाजाच्या सेंटिमेंट्स कशा आहेत या एवढ्या महत्त्वाच्या काय आहेत, यावरून राजकारण कसं साधलं जाऊ शकतं, सगळ्याची माहिती जाणून घेऊयात या विशेष वृत्तातून....
सगळ्यात आधी महादेवी हत्तीनीसाठी चालू झालेला बॉयकॉट जिओचा ट्रेंड आहे काय ते बघूया. महादेवी हत्तीनीला वनतारा केंद्रामध्ये पाठवण्याच्या निर्णयाच्या विरोधामध्ये नांदणी ग्रामस्थांनी अनोख्या प्रकारे निषेध नोंदवलाय. या गावातल्या जवळपास ७००० लोकांनी जिओ सिमचा त्याग करत आपला मोबाईल नंबर एररटेल मध्ये पोर्ट केला. हा निषेध म्हणजे इथल्या गावकऱ्यांच्या भावनांचा उद्रेख होता. महादेवी आमच्या घरची लेक आहे. तिला परत आणा अशी मागणी करत गावकऱ्यांनी आपला राग व्यक्त केला. हळूहळू फक्त नांदणी ग्रामस्थच नाही तर संपूर्ण शिरोळ तालुक्यातले लोक आपले जिओ सिम इतर कंपनीच्या सिम कार्डमध्ये पोर्ट करायला लागले. गेल्या तीन दिवसांमध्ये सोशल मीडिया वरती हॅशटॅग सेव्ह महादेवी आणि हॅशटॅग बॉयकॉट जिओ असे हॅशटॅग ट्रेंड झाले आहेत. नांदिनी ग्रामस्थांनी फक्त जिओ सिमच नाही तर अंबानीच्या उत्पादनांवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता हा मुद्दा येत्या काही दिवसांमध्ये चांगल्याच चिघळण्याची शक्यता आहे.
महादेवी हत्तीसाठी जैन मठाने सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली होती. पण या हत्तीच परिसरातल्या जैन समाजामध्ये इतकं महत्त्व का आहे ? तर कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये नांदणी हे छोटसं गाव या गावाला तब्बल १३०० वर्षांचा धार्मिक इतिहास असल्याचं सांगितलं जातं. त्या गावात जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांचा मठ आहे. ते दिगंबर जैन परंपरेच्या अंतर्गत येणाऱ्या स्थानिक भट्टारका आसनाचे प्रमुख आहेत. हा मठ म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरच्या ७४८ गावातल्या जैन समाजाचा केंद्रबिंदू आहे. मुगल बादशाह अकबर याने सर्वप्रथम या संस्थानाला हत्ती भेट दिला होता असं सांगितलं जातं. तेव्हापासून इथं हत्ती पाळण्याची परंपरा सुरू झाली आहे. महादेवी हत्तीने याच परंपरेचं प्रतिनिधित्व करत होती. महादेवीला ३५ वर्षांपूर्वी कर्नाटकच्या जंगलातून या मठामध्ये आणलं होतं. त्यावेळी तिचं वय अवघ सहा वर्षे होतं. म्हणजे गेल्या साडेतीन दशकांपासून ही हत्ती या जैन मठामध्ये वास्तव्यास होती. जैन परंपरेमध्ये हत्ती हे शांती, शक्ती आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं. त्या मठातल्या लोकांसाठी महादेवी ही फक्त एक हत्ती नव्हती तर तिला एक पवित्र व्यक्तीप्रमाणे वागवल जात होत. धार्मिक कार्यक्रम आणि मठातल्या कार्यक्रमांमध्ये महादेवीची उपस्थिती शुभ मानली जात होती. अनेक भक्त तिला महादेवीजी अस आदरार्थी नावाने संबोधित करायचे. स्थानिकांच्या मते महादेवी हत्तीन ही जैन मठाच्या वारश्याच प्रतीक बनली होती. त्यामुळे मठाचा प्रभाव या भागामध्ये शतकानुशतक राहिला आहे. २५ जुलैला सुमारे ७००० जैन धर्मीय आणि ग्रामस्थांनी नांदणी इथं मूक मोर्चा काढला होता. महादेवी हत्तीन जैन मठातच राहावी अशी त्यांची मागणी होती. या हत्तीचं जैन धर्मयांसाठी भावनिक आणि धार्मिक महत्त्व आहे असं मोर्चा काढणाऱ्यांचं म्हणणं होतं. ही हत्ती मठातच राहावी या मागणीसाठी जैन समुदायाने गावात बंदही पाळला होता. आम्ही महादेवी हत्तीन देणार नाही ती आमची आहे आम्ही महादेवीच्या अस्तित्वासाठी संघर्ष करू असे बॅनर अनेक ठिकाणी झळकले होते. महादेवी हत्तीला मठातच ठेवण्यासाठी मठाचे सदस्य स्थानिक राजकारणी आणि सर्वधर्मीय नागरिकांसह समुदायाचे नेते आता एकत्र आलेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी, शिरोळ आणि कर्नाटक सीमेवरच्या भागांमध्ये जैन धर्मीयांच पूर्वीपासून वास्तव्य राहिलय. कोल्हापूर जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 4% लोकसंख्या जैन धर्मीयांची आहे. त्यामुळे हा जिल्हा देशातल्या जैन धर्मियांचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या जिल्ह्यांपैकी एक मानला जातो. कोल्हापुरातल्या जैन समुदायाचा स्थानिक भागामध्ये प्रभाव आहे. मराठा आणि ओबीसींच्या तुलनेमध्ये त्यांची संख्या कमी आहे पण त्या आर्थिक दृष्ट्यास सक्षम आहेत. विशेषतः इचलकरंजी, जयसिंगपूर आणि शाहूवाडी सारख्या शहरांमध्ये व्यापार आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्यांचा प्रभाव आहे. इथला जैन समुदाय सदन असल्यामुळे त्यांना शाळा, महाविद्यालय आणि धार्मिक ट्रस्ट निधी देणं शक्य होतं. त्यामुळे या भागामध्ये या समुदायाची सॉफ्ट कॉवर असल्याचं म्हटलं जातं. जैन समाज हा कायमच श्रद्धा आणि वारसाच्या मुद्द्यावरून एकत्र येताना दिसतो त्यामुळेच या समाजाकडे इथली निवडणूक फिरवण्याची ताकद असल्याचं म्हटलं जातं.
यावेळी हा समाज महादेवी हत्तीच्या मुद्द्यावरून एकत्र आलाय त्यामुळं आता ज्या नेत्यानं हा मुद्दा उचलला त्याला इथल्या जैन समाजाचा पाठिंबा मिळू शकतो आणि तो निवडणुकीतही गेम चेंजर ठरू शकतो. कोल्हापूरच्या या भागामध्ये जैन समाज प्रभावशाली आहे. इथे नेहमीच जैन विरुद्ध मराठा असं राजकारण चालत आलय. सध्या राजेंद्र पाटील येड्रावकर हे शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. जे जैन समाजातून येतात. शिरोळ हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये येतो. सध्या धैर्यशील माने तिथले खासदार आहेत आणि ते मराठा समाजाचे आहेत. त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा पराभव केला होता. राजू शेट्टी हे जैन समाजाचे आहेत. राजू शेट्टी यांचा पराभव झाला असला तरी त्यांची तिथे ताकद आहे. राजू शेट्टी येत्या रविवारी नांदणी पासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आत्मक्लेश पदयात्रा काढणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी महादेवी हत्तीनीसाठी मुखमोर्चा ही काढला होता. तर दुसरीकडे या हत्तीनीला परत आणण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी सह्यांची मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. तर धैर्यशील माने यांनी सुद्धा हा मुद्दा संसदेमध्ये मांडणार असल्याचं म्हटलंय. म्हणजेच या मुद्द्यावरून जैन समाजाचा भावना लक्षात घेत त्याला कॅप्चर करण्यासाठी सर्व जातीतले नेते समोर येताना दिसतायत.
कोल्हापुरात सध्या ज्याप्रमाणे महादेवी हत्तीनीचा मुद्दा गाजतोय तसाच ११ वर्षांपूर्वी सुंदर हत्तीचा मुद्दा प्रचंड गाजला होता. १९९९ साली आसाम मध्ये जन्मलेल्या सुंदर हत्तीला २००७ मध्ये कोल्हापुरात आणलं होतं. या हत्तीला कोल्हापुरातल्या जोतीबा मंदिरामध्ये दान देण्यात आलं होतं. या हत्तीला कोल्हापुरात आणण्यात आले त्यावेळचे आमदार विनय कोरे यांची भूमिका महत्त्वाची होती. विनय कोरे यांनी हा हत्ती बिहारमधल्या सोनपूर येथून विकत घेतला होता. पण काही वर्षांनी प्राणीमित्र संघटनेने जोतीबा मंदिरात हत्तीचा छळ होत असल्याची तक्रार करत त्याची मुक्तता करून प्राणी संग्रहालयामध्ये सोडावं अशी मागणी उच्च न्यायालयाकडे मागणी केली होती. एप्रिल २०१४ मध्ये जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने हत्तीची सुटका करण्याचे निर्देश दिले तेव्हा विनय कोरे यांनी हा निर्णय रोखण्यासाठी अपील दाखल केलं होतं पण न्यायालयाने त्यांचं अपील फेटाळून लावलं. त्यानंतर या हत्तीला कर्नाटकच्या बनारगट्टा पार्कमध्ये नेण्यात आलं. तिथं २०२२ मध्ये त्याचं निधन झालं. सुंदर हत्ती हा कोल्हापूरच्या जोतीबा मंदिराच्या पालखीचा मानकरी होता. जोतीबा मंदिराचं मराठा समुदायामध्ये विशेष महत्त्व आहे. जोतीबाला अनेक मराठा आणि कुणबी कुटुंबाचं कुलदैवत मानलं जातं. सुंदर हत्तीमुळे आमदार विनय कोरे यांच जोतीबा मंदिराशी वेगळ नातं आहे त्यांनी निवडणुकीपूर्वी अनेकदा ज्योतिबा मंदिराला भेट दिली आहे तसं पाहिलं तर शाहूवाडीचे आमदार विनय कोरे हे लिंगायत समाजातून येतात. त्यांचा मतदारसंघ हा प्रामुख्याने मराठा आणि कुणबी समाजाचा प्राबल्य असलेल्या पट्ट्यामध्ये येतो. पण विनय कोरे आणि त्यांच्या जनसुराज्यशक्ती पक्षाला मराठा समाजाचा चांगला सपोर्ट मिळालाय त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोरे हे विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे मराठा उमेदवार सत्यजित पाटील यांचा पराभव केला होता. २०२४ मध्ये त्यांनी आपलं मताधिक्य आणखी वाढवलं यावेळी कोरे यांना ५५.६८% मतं मिळाली. मुख्य म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा सत्यजित पाटलांचा पराभव केला. विनय कोरे हे ओबीसी आहेत. पण त्यांनी मराठा बौद्ध क्षेत्रामध्ये निवडून येताना मराठा उमेदवाराला पराभूत करण्याचं काम केलंय. आता महादेवी हत्तीच्या मुद्द्यावरूनही तिथले नेते अशीच जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. या मुद्द्याला हात घालून या भागामध्ये ताकत असलेल्या जैन समाजाला आपल्याकडे आणता येतं असं इथल्या राजकीय नेत्यांना वाटतय. त्यामुळं सध्या महादेवी हत्तीचा मुद्दा चांगलाच तापतोय. आता यामध्ये पुढे काय होतं ? महादेवी हत्तीला परत आणलं जातं का ? आणि यावरून राजकारण रंगणार का ? हे पाहणं महत्त्वाचं असेल.