सिंधुदुर्ग प्राधिकरणातील होर्डिंग्ज, पोस्टर, फलक, बोर्ड आठ दिवसांत काढावेत
schedule18 Jun 25 person by visibility 84 categoryसिंधुदुर्ग
सिमंतिनी मयेकर (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रात विविध प्रकारचे (राजकीय, सामाजिक, वैयक्तिक शुभेच्छा) इ. प्रकारचे होर्डिंग्ज, पोस्टर्स, फलक बोर्ड इ. विनापरवानगी लावण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. असे लावण्यात आलेले सर्व प्रकारचे होर्डिंग्ज, पोस्टर्स, फलक बोर्ड इ. सदरची सूचना प्रसिध्द झाले पासून आठ दिवसांत आपले स्तरावरून काढण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी, व सचिव सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण तथा अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिल्या.