सुशांत पोवार (संपादकीय) - आपण दर वेळेस आणि अगदी सहजपणे खात असलेल्या पॅरासिटामॉल पॅंडी आणि शेलकल सारख्या ज्या गोळ्या आहेत या क्वालिटी टेस्ट मध्ये फेल झालेल्या आहेत ताप सर्दी खोकला चमक भरली असं सर्व काही झाल्यावर आपण किंवा अनेक जण मेडिकल मध्ये जातात काय होतंय ते सांगतो आणि मेडिकल वाला जे औषध देतो ते आपण औषध वापरायला सुरु करत असतो. तुम्ही पण जर का अशाच पद्धतीने औषध घेत असाल तर वेळेत सावध होणं गरजेचे आहे. केंद्र सरकारने रोजच्या सहजपणे वापरल्या जाणाऱ्या १५० हून अधिक औषधांवरती बंदी घातली होती आणि आता पॅरासिटामॉल सह ५३ औषध क्वालिटी टेस्ट मध्ये फेल झालेली आहेत. याच्यामध्ये विटामिनच्या गोळ्या आहेत, शुगर आणि ब्लड प्रेशरसाठी वापरणारी जी औषध आहेत याच्यासोबतच अँटीबायोटिक्सचा सुद्धा समावेश आहे. देशातील सर्वात मोठी औषध नियामक संस्था सेंट्रल ड्रग्स स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन सीएसडीएसओ यांनी या संदर्भातली यादी जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे. क्वालिटी टेस्ट मध्ये फेल झाली म्हणजे आपण बनावट औषध खातो का ? हे आज आपण संपादकीय मधून जाणून घेणार आहोत. बंदी का घालण्यात आलेली आहे या औषधांवरती हे समजून घेणार आहोत आणि टेस्ट मध्ये फेल झाली म्हणजे नेमकं काय झालं याच्यावरती सुद्धा लिखाणातून प्रकाश टाकणार आहोत.
द सेंट्रल ड्रग स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणजेच सीएसडीएसओ यांनी या औषधांसंदर्भात असा स्पष्टपणे इशारा दिलेला आहे की नॉट ऑफ स्टॅंडर्ड क्वालिटी त्यांनी त्या संदर्भातली ४८ औषधांची यादी जाहीर केलेली असली तरीसुद्धा ५३ औषध चाचणीमध्ये ही नापास झालेली दिसून येतात. आता याच्यातली जी पाच औषध आहेत शिल्लक पाच औषध ती औषध बनवणारी कंपनीने हे औषध त्यांच्या कंपनीचं नसल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजेच काय तर त्यांच्या कंपनीच्या नावाने बनावट औषध बाजारामध्ये विकली जात होती ज्या औषधांवरती बंदी घातली गेलेली आहे. त्याच्यामध्ये सन फार्माची पॅंटासीड टॅबलेट याचा सुद्धा समावेश आहे जी औषध ऍसिड रिफ्लेक्सच्या उपचारांसाठी वापरली जातात. गेल्या काही वर्षांमध्ये या औषधांचा वापर वाढलेला होता त्याच्यामुळे ही बनावट जर का औषध असतील तर त्याच्यावरती चिंता करण्याचं कारण निश्चितपणे बंदी घातलेल्या औषधांच्या यादीमध्ये विटामिन सी आणि डी थ्री टॅबलेट, शेलकल, विटामिन बी थ्री कॉम्प्लेक्स, विटामिन सी सॉफ्ट जेल, अँटासीड, पॅन डी, पॅरासिटामॉल गोळ्या, आयपी 500 mg, ब्लड शुगर साठी मधुमेहावरील औषध जे आहे ते ग्लिमेपिराईड आणि उच्च रक्तद्रवासाळीच औषध टेलमिसार यांचा देखील समावेश आहे. हे सर्व औषध क्वालिटी टेस्ट मध्ये फेल झालेले आहेत बंदी असलेल्या औषधांच्या यादीमध्ये क्लोनाझेपम टॅबलेट, वेदनाशामक डायक्लोफिनाक, श्वसन रोगासाठी वापरल्या जाणाऱ्या अॅम्ब्रोक्सोल आणि फंगल विरोधी फ्लुकोनाझोल आणि काही मल्टीविटामिन आणि कॅल्शियम गोळ्यांचा सुद्धा समावेश आहे.
आता मिंटने जी माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार या ज्या गोळ्या आहेत किंवा हे जे प्रॉडक्ट आहेत हे युनिक्युअर इंडिया लिमिटेड, हेट्रो ड्रग्स हेल्थ बायोटेक लिमिटेड, अल्केम लॅबोरेटरीज, हिंदुस्तान अँटीबायोटिक लिमिटेड, लाईफ मॅक कॅन्सर लॅबोरेटरीज प्युअर अँड क्युअर हेल्थ केअर आणि मेघ लाईफ सायन्सेस यांसारख्या फार मोठ्या कंपन्यांचे आहेत. आता ज्या दोन लिस्ट जाहीर केलेल्या आहेत एक लिस्ट जी आहे त्याच्यामध्ये ४८ ड्रगचा समावेश आहे आणि उरलेली जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये पाच ड्रगचा समावेश आहे जे कंपन्या म्हणतात की ही औषध आम्ही बनवलेलीच नाहीयेत मग त्याच्यासाठीची जी लिस्ट आहे त्याला त्यांनी स्पिरियस अडल्टर आणि मिस ब्रँंडेड असं नाव दिलेलं आहे. आता हे जे मिस अडल्ट आहे किंवा मिस ब्रँंडेड जे आहे त्याच्यामध्ये कोणकोणती औषध आहेत ते लगेच सांगतो तर पल्मसील त्याच्यामध्ये दिलेलं आहे पॅंटासीड एक आहे युरोसोल 300 एक आहे टेलमा एच हे एक औषध त्याच्यामध्ये आहे आणि डेफ्ला झॅक टॅबलेट्स ज्या आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये आहेत आता हे जे पाच औषध आहेत त्याच्यावरती जे जे ब्रँडिंग करण्यात आलेलं आहे यासोबत बॅच नंबर दिलेला आहे तर कंपनीचं म्हणणं असं आहे की ही औषध आमची नाहीतच, पोटाच्या संसर्गासाठी दिलं जाणारं मेट्रोनिडाझोल हे जे आहे हे हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेड ने तयार केलेलं औषध जे आहे ते टेस्ट मध्ये फेल झालेलं आहे त्यासोबतच हाय ब्लड प्रेशर वरती वापरल्या जाणाऱ्या टोरेंट फार्मास्युटिकलच्या शेलकल गोळ्या ज्या आहेत ज्या कॅल्शियम आणि विटामिन डी थ्री च्या टॅबलेट आहेत त्या सुद्धा या चाचणीमध्ये फेल झालेल्या आहेत. अल्केम हेल्थ सायन्सचं अँटीबायोटिक कॅल्बम ६२५ हे जे औषध आहेत ते सुद्धा या चाचणीमध्ये मध्ये फेल झालेले आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार ग्लुकोमायलेज पेक्टिनेस एमायलेस प्रोटीज अल्फा गॅलेक्टोसिडेस सेल्युलेज लिपेज ब्रोमेलेन झायलेनेज हेमी सेल्युलेज लॅक्टेज माल्ट डायस्टेज ही सगळी याच्यामध्ये समाविष्ट आहेत ज्या औषधांवरती बंदी घालण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये केसांच्या उपचारांसाठी वापरलं जाणारं अँटी पॅरासायटिक औषध जे आहेत त्यांचा सुद्धा समावेश आहे.
सरकारने लोकांना या औषधांच्या जागी इतर औषध वापरण्याचा सल्ला मागेच दिलेला आहे आता हे जे अलर्ट आहेत हे कधी देण्यात आलेत तर त्या त्या राज्यातल्या जे ड्रग्स इन्स्पेक्टर असतात औषधा संदर्भातले जे अधिकारी आहेत त्यांनी रॅन्डम मंथली जे सॅम्पल गोळा केले होते त्याच्या आधारावरती हे अलर्ट देण्यात आलेले आहेत. ज्याच्यातून ही कमी दर्जाची औषध सगळ्यांसमोर आलेली आहेत आणि त्याचे संभाव्य धोके सुद्धा हायलाईट केले गेलेत आता हे जे त्रुटी त्यांनी काढलेत किंवा टेस्टमध्ये फेल झालेले आहेत त्याच्या मागचं कारण काय आहे तर सबस्टॅंडर्ड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस इन एडिक्वेट क्वालिटी कंट्रोल आणि कंटॅमिनेशन ड्युरिंग प्रोडक्शन हे त्या संदर्भातली कारणं सांगितली गेलीत या औषधांमध्ये इनकंसिस्टंट लेवल्स ऑफ ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडिएंट्स ज्याला एपीआय म्हणतात हे आहेत त्याच्यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनलेली आहे. डॉक्टर जे आहेत या क्षेत्रातले तज्ञ जे आहेत त्यांच्यानुसार ज्यावेळेस एपीआय म्हणजे इनकन्सिस्टंट लेव्हल ऑफ ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडिएंट्स असतील हे जर का कुठेतरी कॉम्प्रोमाईज झालेलं असेल इनकरेक्ट असेल तर किंवा कंटॅमिनेशन जर का झालेलं असेल तर अशा वेळेस त्या जो ह्या गोळ्या घेत असेल त्याला गंभीर परिणामांना सामोर जावं लागू शकतं आणि त्याच्यासाठीचे जे उपचार आहेत ते त्याला लॉंग टर्म घ्यावे लागू शकतात असं म्हटलेलं व्हेन द लेवल्स ऑफ एपीआय आर इनकरेक्ट ऑर व्हेन कंटॅमिनेशन ऑकर्स दिस ड्रग्स मे नॉट इफेक्टिव्हली ट्रीट कंडिशन्स लाईक पेन ऑर फिवर अँड कुड इव्हन कॉज ऍडव्हर्स रिएक्शन्स त्याच्या होऊ शकतात.
ऑगस्ट २०२४ मध्ये सुद्धा केंद्र सरकारने १५६ फिक्स डोस कॉम्बिनेशन जे आहेत अशा औषधांवरती बंदी घातलेली होती. आता ताप आणि सर्दी याच्या व्यतिरिक्त जे आपण पेन किलर घेतो वेदनाशामक जे घेतो किंवा मल्टीव्हिटामिन यासोबतच अँटीबायोटिक म्हणून जे घेतो त्याचा याच्यामध्ये समावेश होता एका गोळीमध्ये एकापेक्षा जास्त औषधांचे मिश्रण ज्यावेळेस केलं जातं तेव्हा त्याला फिक्स डोस कॉम्बिनेशन असं म्हणतात. याच औषधांना कॉकटेल ड्रग सुद्धा म्हटलं जातं आता कॉकटेल म्हणजे काय तर अनेक प्रकारची औषध एकत्रित केली जातात आणि नवीन म्हणून विकलं जातं उदाहरणार्थ एखाद्याला जर का वेदना होत असेल ताप जर का आलेला असेल तर डॉक्टर दोन औषध लिहून देतात म्हणजे मेफानॅमिक ऍसिड आणि पॅरासिटामॉल आता अनेक कंपन्या हे दोन औषध विशिष्ट प्रमाणात मिक्स करून वेगवेगळ्या नावाने विकतात अशा औषधांना निश्चित डोस संयोजन असं म्हटलं जातं. म्हणजे फिक्स डोस कॉम्बिनेशन असं त्याला म्हटलं जातं. भारतीय बाजारपेठेमध्ये अशा प्रकारची हजारो औषध आहेत आणि भारत सरकारच्या तज्ञ समितीने यापैकी १५६ एकत्रित केलेल्या औषधांवरती बंदी घालण्याचा निर्णय ऑगस्ट २०२४ मध्येच घेतलेला आहे. या औषधांचा मानवी शरीरावरती हानिकारक परिणाम होत होता. आता जर का ही सबस्टॅंडर्ड औषध घेतली जी ही लिस्ट आलेली आहे जी बंदी घातलेली औषध आहेत ही जर का औषध घेतली तर काय त्रास होऊ शकतो तर हेल्थ इशूज जे आहेत ते प्रोलोंग असू शकतात खूप मोठ्या कालावधीसाठी त्या इशूचा तुमच्यावरती प्रभाव पडू शकतो. उदाहरणार्थ दाखल जर का म्हणायचं म्हटलं तर पॅरासिटामॉल जी आहे जी आपण अगदी सहजपणे काही दुखत असेल वेदना होत असतील ताप आलेला असेल जर का आपण ती घेतली आणि जर का ते पॅरासिटामॉल याच्यामध्ये जर का इनकन्सिस्टंट एपीआय लेव्हल जर का असतील तर एक तर त्या गोळीचा कोणत्याही पद्धतीचा तुमच्यावरती प्रभाव जाणवणार नाही. जर का खूप काळ ती गोळी जर का घेत राहिली त्याच कॉम्बिनेशनचे जर का घेत राहिलं तर सिरीयस कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या गोळ्या ज्या आहेत त्यांचा कोणत्याही पद्धतीचा लाभ शरीराला होणार नाही. यासोबतच हे लो क्वांटिटीचे जर का मेडिकेशन घेत राहिलं तर लिव्हर वरती त्याचा परिणाम होऊ शकतो किडनी वरती सुद्धा त्याचा निश्चितपणे परिणाम होऊ शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
ऑगस्ट २०२४ मध्ये जे एकत्रित औषध आहेत म्हणजे फिक्स डोस कॉम्बिनेशन जे आहे त्याच्यामध्ये बंदी घातलेली औषध आहेत त्याच्यामध्ये वर लिहिले आहे वेदना आणि ताप म्हणजे काही आपण पेन होत असेल ताप जर का आलेला असेल तर सरकारनं पॅरासिटामॉल आणि मेफेनॅमिक ऍसिड प्लस पॅरासिटामॉलचं जे मिश्रण असलेलं औषध आहे त्याच्यावरती बंदी घातलेली आहे आता ही औषध जी आहेत ही जनरली संधिवातामध्ये यासोबतच मासिक पाळीच्या वेदनांमध्ये वापरली जात होती. या दोन्हींच्या मिश्रणासह अनेक औषध बाजारामध्ये उपलब्ध आहेत पण आता ती इथून पुढे उपलब्ध होणार नाहीत. जर का कोणी पूर्वीच ही औषध दिलेली असतील तर ती घेऊ नका असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. पोटदुखीसाठी अनेक औषध वापरली जातात यापैकी अनेक जी फिक्स डोस कॉम्बिनेशन औषध आहेत त्याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. याच्यामध्ये सुकराल फेट आणि डोमपेरीडोनच्या मिश्रणावरती बंदी घालण्यात आलेली आहे.
आता ऍसिडिटी खूप साऱ्या जणांना होते उलट्या जरी झाल्या तरीसुद्धा डोमपेरिडोन सुक्रो फॅट यांचे जे एकत्रित औषध आहे त्याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. आता कामोत्तोजक औषध सुद्धा काही आहेत त्याच्यावरती सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे. म्हणजे फिक्स डोस कॉम्बिनेशन जे आहे हे १५६ औषधांची यादी आहे आणि आता हे नवीन ५३ औषधांची यादी आहे आता जर का तुम्ही याच्यापैकी कोणतीही औषध जर का घेत असाल गोळ्या जर का घेत असाल तर त्या गोळ्या घेणं थांबवणं गरजेचं आहे. यासोबतच तेच जरी औषध मिळालं तरीसुद्धा डॉक्टरांना परत एकदा दाखवून ते चेक करून घेणं गरजेचं आहे यासोबतच जी औषध तुम्ही घेत असाल ती आयएसओ स्टॅंडर्डची आहेत का यासोबतच डब्ल्यू एचओ जीएमपी स्टॅंडर्डची आहेत का हे बघून घेणं गरजेचं आहे आयएसओ डब्ल्यू एचओ जीएमपी हे त्याच्यासाठी जे क्वालिटी इंडिकेटर्स आहेत हे जर का नसतील तर औषध सहसा तुम्ही नाही घेतले तर अधिक योग्य राहील मग आता जर का तुम्ही ही औषध घेत असाल तर या औषधांसाठी पर्याय उपलब्ध आहे का तर निश्चितपणे तुम्ही घेत असलेल्या औषधांसाठी पर्याय उपलब्ध असतील पण हे पर्याय जे आहेत ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही बघायला पाहिजेत.