Breaking : bolt
काही नेत्यांच्या राजकीय अपरिपक्वतेमुळे जयंत पाटील - बाळासाहेब थोरात ठरले महाराष्ट्रात नंबर एकचे नेते....बनावट औषध पुरवठा प्रकरण बाहेर येऊ नये म्हणूनचंं तर झाले नसेल औषध निर्माण अधिकाऱ्याचंं निलंबन ?गणपती व आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील मानव गवंडी टोळी हद्दपारसंजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील सागर लोखंडे टोळी हद्दपार; सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात २ वर्षे प्रतिबंधितमुल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने दाम्पत्याची फसवणूक, दागिने चोरी करणारा संशयित जेरबंदराष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपकोट्यवधींचा औषध खरेदी घोटाळा उजेडात, कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांची "आरोग्य भवन" वारी ?ठाकरे "ब्रँँड" ला धक्का पोहोचवणारा निकाल, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचा ठाकरे बंधूंना टोमणा !केंद्र सरकारची मुख्य निवडणूक आयुक्तांमुळे कोंडी होण्याची शक्यता, २४ तासात महाभियोग आणण्याची तयारी.....स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून कोकणात महायुतीतील बडे नेते राणे - सामंत यांच्यात तणाव.....?

जाहिरात

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्कृष्ट लघु उद्योजकांनी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

schedule09 Jun 25 person by visibility 207 categoryसिंधुदुर्ग

सिमंतिनी मयेकर (सिंधुदुर्ग) -  जिल्ह्यातील यशस्वी उद्योजकांच्या मेहनतीचे, चिकाटीचे व जिद्दीचे कौतुक करण्याच्या हेतुने जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सूक्ष्म व लघु उद्योजकांसाठी जिल्हा पुरस्कार योजना सुरु करण्यात आलेली आहे.या योजनेअंतर्गत सन 2024 च्या पुरस्कारांसाठी पात्र सुक्ष्म व लघु उद्योजकांनी 30 जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी केले आहे.

                 या योजनेअंतर्गत प्रथम पुरस्कार विजेत्यास रोख रु. 15 हजार व सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ व व्दितीय पुरस्कार विजेत्यास रोख रु. 10 हजार सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात येते. योजने अंतर्गत 2024 च्या पुरस्कारांकरिता अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण पात्रतेच्या अटी पुढीलप्रमाणे:- अर्जदार घटक या जिल्ह्यातील दि. 01/01/2021 रोजी किंवा त्यापुर्विचा स्थायी लघु उद्योग नोंदणीकृत, पार्ट-2 ज्ञापन स्वीकृतीधारक घटक असावा. मागील दोन वर्षे सलग उत्पादनात असावा. कोणत्याही बँकेचा अथवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.अर्जदार यापूर्वी राष्ट्रीय/अंतरराष्ट्रीय अथवा जिल्हा पुरस्कार मिळालेला नसावा. निर्याताभिमुख घटक, महिला उद्योजक, मागासवर्गीय उद्योजक यांना प्राधान्य. विहीत नमून्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदूर्ग येथे उपलब्ध आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes