Breaking : bolt
काही नेत्यांच्या राजकीय अपरिपक्वतेमुळे जयंत पाटील - बाळासाहेब थोरात ठरले महाराष्ट्रात नंबर एकचे नेते....बनावट औषध पुरवठा प्रकरण बाहेर येऊ नये म्हणूनचंं तर झाले नसेल औषध निर्माण अधिकाऱ्याचंं निलंबन ?गणपती व आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील मानव गवंडी टोळी हद्दपारसंजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील सागर लोखंडे टोळी हद्दपार; सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात २ वर्षे प्रतिबंधितमुल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने दाम्पत्याची फसवणूक, दागिने चोरी करणारा संशयित जेरबंदराष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपकोट्यवधींचा औषध खरेदी घोटाळा उजेडात, कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांची "आरोग्य भवन" वारी ?ठाकरे "ब्रँँड" ला धक्का पोहोचवणारा निकाल, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचा ठाकरे बंधूंना टोमणा !केंद्र सरकारची मुख्य निवडणूक आयुक्तांमुळे कोंडी होण्याची शक्यता, २४ तासात महाभियोग आणण्याची तयारी.....स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून कोकणात महायुतीतील बडे नेते राणे - सामंत यांच्यात तणाव.....?

जाहिरात

 

सोलापूरच्या पुरवठादाराची काही अधिकाऱ्यांच्या अवैध खरेदी प्रकरणी थट्टात्मक चर्चा, राजकीय ताणतणाव वाढण्याची शक्यता

schedule07 Aug 25 person by visibility 165 categoryकोल्हापूर

संजय पोवार - वाईकर (कोल्हापूर) - सोलापूरचा शासकीय औषध पुरवठादार कोल्हापुरात अधिकारांच्या अवैध खरेदीच्या चर्चेत अडकला आहे. अल्पावधीत आपली प्रतिष्ठा निर्माण करणाऱ्या या पुरवठादाराने कोल्हापुरातील एका अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये माहिती अधिकारांतर्गत काही शासकीय अधिकारांच्या अवैध खरेदीबाबत चर्चा केल्याने मोठा वाद उडाला आहे. यामुळे संबंधित अधिकारी आणि प्रशासन यांच्यात तणाव निर्माण होण्याची चिन्हे असून पुढील तपास सुरू आहे.

                   मुळात सोलापूरमध्ये सरकारी पुरवठा व्यवस्थेत अल्पावधीत ओळख निर्माण करणाऱ्या या पुरवठादाराचा कोल्हापुरात आधी केलेल्या कामाची चर्चा अगदी जोरात आहेत. खासकरून कोल्हापूर जिल्ह्याच्या आसपासच्या भागात माहिती अधिकारांतर्गत काही महत्त्वाच्या शासकीय अधिकारांच्या अनधिकृत खरेदी संदर्भात चर्चा झाल्याने ती चर्चा मोठ्या वादाचे कारण ठरू शकते. सोलापूरमधील काही अधिकाऱ्यांनी या पुरवठादाराला "बुडाखाली आधी काय आहे बघ, मग दुसऱ्यांचे विषय काढ" असे कठोर शब्दांत निषेध नोंदवला आहे. ही व्यक्ती कोल्हापुरात एका मोठ्या निविदा प्रक्रियेत सहभागी झाली असून निविदा जाहीर होण्याआधीच या अधिकाऱ्याला भेटण्याचे कारणही निश्‍चित अनिश्चित राहिले आहे. याला प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी गंभीरतेने पाहिले पाहिजे.

                  चर्चेत दिसून आलेली अत्यंत थट्टत्मक शैली आणि आशय यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या अडचणींमुळे पुढे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता असल्याने संबंधितांनी पुरवठादाराविरुद्ध माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे. तसेच, मुंबईतील मंत्रालयात या चर्चेची तक्रार तोंडी सचिवांपर्यंत पोहोचवली गेल्याने शीघ्रच माहिती घेऊन योग्य ती कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत. याप्रकरणात चर्चा करण्यात आलेला व्यक्ती एका राष्ट्रीय पक्षाचा मोठा पदाधिकारी असून वेळेत योग्य ती कारवाई न झाल्यास संबंधित खात्याच्या मंत्र्यांविरोधात घेराव घालण्याचा इशाराही त्या पक्षाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता राजकीय ताणतणाव निर्माण करू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes