Breaking : bolt
गैरप्रकार बाहेर येऊ नये म्हणून लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चार्ज काढून घेतले जातील अशी दबक्या आवाजात चर्चा ? शंका खरी ठरल्यास राज्याचे लक्ष कोल्हापूरवर केंद्रित होण्याची शक्यता...?सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत मोठी कारवाई, वरिष्ठ अधिकारी निलंबित....अमराठी औषध पुरवठादारांकडून झटपट पैसे कमविण्याच्या हव्यासापोठी कोल्हापुरचंं आरोग्य बिघडविण्याचा प्रयत्न....राजकीय दबावापोटी मनापाचा जैव वैद्यकीय प्रकल्प बंद पाडून खाजगी प्रकल्प टाकण्याचा डाव अखेर यशस्वी, मनपाच्या उत्पन्नाचा एक स्त्रोत झाला कमीसंस्कृती बचाव मोर्चाने सांगलीतील तीन घराण्यांचे गणित जुळून आले तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकतेकाही नेत्यांच्या राजकीय अपरिपक्वतेमुळे जयंत पाटील - बाळासाहेब थोरात ठरले महाराष्ट्रात नंबर एकचे नेते....बनावट औषध पुरवठा प्रकरण बाहेर येऊ नये म्हणूनचंं तर झाले नसेल औषध निर्माण अधिकाऱ्याचंं निलंबन ?गणपती व आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील मानव गवंडी टोळी हद्दपारसंजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील सागर लोखंडे टोळी हद्दपार; सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात २ वर्षे प्रतिबंधितमुल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने दाम्पत्याची फसवणूक, दागिने चोरी करणारा संशयित जेरबंद

जाहिरात

 

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कोकण विभागातील 2,738 रूग्णांना 25 कोटी 86 लाखांची मदत

schedule01 Aug 25 person by visibility 274 categoryसिंधुदुर्ग

सिमंतिनी मयेकर (सिंधुदुर्ग) - राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः कोकण विभागात मागील सात महिन्यामध्ये 2,738 रूग्णांना तब्बल 25 कोटी 86 लाख 37 हजार रूपयांची मदत दिली गेली आहे. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसेच जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. ज्यामुळे रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही. रुग्णांनी प्रथम महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा. जर या योजनांद्वारे उपचार शक्य नसतील, तर, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे संलग्न असणाऱ्या रुग्णालयातून अर्ज करता येतो. यामुळे शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होतो आणि निधीचा उपयोग खऱ्या गरजू रुग्णांपर्यंत पोहोचत असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.

20 गंभीर आजारांसाठी मदत -

कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्षे 2 ते 6), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, बर्न (भाजलेले) रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण 20 गंभीर आजारांसाठी अर्थसहाय्य दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे :-

  • • रूग्णाचे आधार कार्ड

  • • रूग्णाचे रेशन कार्ड

  • • रूग्ण दाखल असल्यास त्याचा जिओ टँग फोटो जोडणे बंधनकारक आहे.

  • • तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (1.60 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे)

  • • संबंधित आजाराचे वैद्यकिय रिपोर्ट जोडणे आवश्यक आहे.

  • • वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र

  • • रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असावी

  • • अपघात ग्रस्त रूग्णांसाठी एफआयआर रिपोर्ट आवश्यक आहे.

  • • अवयव प्रत्यारोपण रूग्णांसाठी झेडटीसीसी नोंदणी पावती आवश्यक आहे.

सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात aao.cmrf-mh@gov.in या ईमेल वर पाठवावीत. अधिक माहिती करिता टोल फ्री क्र. 1800 123 2211 या क्रमांकावर कॉल

कोकण विभागातील मदतीचा आढावा (1 जानेवारी ते 30 जुलै 2025)

जिल्हा एकूण रुग्णसंख्या एकूण मंजूर मदत रक्कम

  1. मुंबई शहर 428 4 कोटी 01 लाख 15 हजार

  2. मुंबई उपनगर 392 3 कोटी 61 लाख 29 हजार

  3. ठाणे 1338 12 कोटी 10 लाख 10 हजार

  4. पालघर 153 1 कोटी 28 लाख 41 हजार

  5. रायगड 219 1 कोटी 97 लाख 03 हजार

  6. रत्नागिरी 164 1 कोटी 30 लाख 60 हजार

  7. सिंधुदुर्ग 44 57 लाख 79 हजार

संपूर्ण राज्यात पेपरलेस प्रणाली, जिल्हा कक्षांची स्थापना आणि विविध सकारात्मक बदलांमुळे गरजू रुग्णांपर्यंत वेळेत मदत पोहोचत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार कक्षाचे कामकाज पारदर्शक पद्धतीने राबवले जात असून निधी खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचत आहे. यापुढेही जास्तीतजास्त गरजू रूग्णांना मदत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes