श्री मारवाडी राजस्थान विद्यालय लातूर येथे राष्ट्रीय विधी सेवा दिन उत्साहात
schedule14 Nov 25 person by visibility 137 categoryआरोग्य विभाग
लातूर प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या समान कार्यक्रमानुसार लातूर येथील श्री मारवाडी राजस्थान विद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय भारूका यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विधी सेवा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला लातूर शहरातील जवळपास ११ विद्यालये व महाविद्यालयातील सुमारे २५० एनसीसी कॅडेट उपस्थित हजर होते. या शिबिरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्यंकटेश गिरवलकर यांनी मार्गदर्शन केले.