प्राथमिक आरोग्य केंद्र, दौलताबाद येथे कुष्ठरोग शोध मोहिमेचे उद्घाटन
schedule18 Nov 25 person by visibility 110 categoryआरोग्य विभाग
दौलताबाद प्रतिनिधी - राज्यातील मागील पाच वर्षांप्रमाणे यंदाही कुष्ठरोग शोध अभियान १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये व्यापक सर्वेक्षणाद्वारे कुष्ठरोग रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र, दौलताबाद येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्या हस्ते कुष्ठरोग शोध मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन करण्यात आले आणि मोहिमेची औपचारिक सुरुवात झाली.