Breaking : bolt
आरोग्याकडे दुर्लक्ष करत बजेटमध्ये ४४ टक्के कपात, आरोग्य विभाग 'राम भरोसे'उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवडीची पहिली इच्छा व्यक्त करणारे नरहरी झिरवाळ यांचा एसीपीचा ट्रॅप आणि आत्ताचा व्हीडीओ काढून मिडियाला देणारा झारीतले शुक्राचार्य कोण ?आमदार राहुल आवाडे यांचे आमदार सतेज पाटील यांच्याबद्दलचे वक्तव्य राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे - संजय पोवारदिनांक ४ जानेवारी ते १० जानेवारी २०२६ चे साप्ताहिक राशिभविष्यनिमेस्युलाईडचं प्रमाण १०० ग्रॅमहून अधिक असणाऱ्या औषधांवर बंदी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेशपालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजनमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रमआचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा – प्रशासक के. मंजूलक्ष्मीमाजी आरोग्यमंत्र्यांना नडलेल्या अधिकाऱ्याची लाचेसाठी मध्यस्थामार्फत लावलेली सेटिंग लाचलुचपतने उधळलीघसादुखी, टॉन्सिलदुखी वर घरगुती आयुर्वेदिक उपाय

जाहिरात

 

वसतिगृहांतील रिक्त जागा भरण्यासाठी आवश्यक ते सर्व करा - जिल्हाधिकारी अशोक काकडे

schedule18 Nov 25 person by visibility 75 categoryसांगली

सांगली प्रतिनिधी - सांगली जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाची 21 वसतिगृहे आहेत. यामध्ये 1 हजार 364 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहे व निवासी शाळांतील उर्वरित रिक्त जागा शंभर टक्के भरण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या.

जिल्हास्तरीय वसतिगृह निरीक्षण समितीची बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण बाळासाहेब कामत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर आणि के. पी. मुधाळे, जिल्ह्यातील वसतिगृहांचे अधीक्षक आदि उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळा व वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. त्यांची माहिती पालकांपर्यंत पोहोचवावी. या रिक्त जागा भरण्यासाठी आवश्यक ते सर्व करावे. याबाबतचा वेळोवेळी आढावा घेण्यात यावा. तसेच, सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल व फायर ऑडिट करून घ्यावे. तसेच, प्रवेशित विद्यार्थ्यांना आपत्कालिन व्यवस्थापनाचे धडे द्यावेत, असे त्यांनी सूचित केले.

या बैठकीत शासकीय वसतिगृहातील सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाची प्रवेशस्थिती, शासकीय इमारत बांधकाम व दुरूस्ती, वसतिगृह बांधकामासाठी जमीन प्राप्त असलेल्या परंतु अद्याप इमारत बांधकाम सुरू न झालेली वसतिगृहे, सामाजिक न्याय भवन, सांगली येथील इमारतीच्या डोम दुरूस्ती, वसतिगृहातील सोयी सुविधा, वसतिगृह प्रवेशितांची आरोग्य तपासणी, मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes