मकरंद परब ( सिंधुदुर्ग) - विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन करत असलेल्या तयारीची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आकाशवाणीवरुन मुलाखतीच्या माध्यमातून दिली आहे. ही मुलाखत गुरूवार दि २४ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५:३० वाजता आकाशवाणीच्या सिंधुदुर्गनगरी केंद्रावरुन (१०३.६ मेगाहार्टझ्) प्रसारित होणार आहे. तसेच News On AIR या ॲपवर देखील प्रसारीत होणार आहे. ही मुलाखत कार्यक्रम अधिकारी श्रीपाद कहाळेकर यांनी घेतलेली आहे. तरी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी ही मुलाखत ऐकण्याचे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आलेले आहे.
या निवडणुकीमध्ये मतदानाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन करत असलेली तयारी, मतदार संख्या, मतदान केंद्रे, ‘स्विप’ या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम, नवमतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग तसेच जनतेला केलेले आवाहन याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.