सांगली (संदीप कांबळे वार्ताहर) : सांगली जिल्हा कारागृहातुन पलायन केलेल्या सदाशिव अशोक सनदे वय २५ वर्षे, रा. मिसळवादी आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली यास त्याच्या गावात अटक करण्यात आली
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकामधील पोहेकों अरुण पाटील आणि पोशि सुरज थोरात यांना त्यांचे बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, सांगली जिल्हा कारागृहातुन पलायन केलेला न्यायबंदी सदाशिव अशोक सनदे हा आष्टा मिसळवाडी येथे त्याचे राहते घरी आला आहे. त्यावेळी त्याचे राहते घराचे परिसरात निगराणी करीत असताना, घराचे आडोशाला एक इसम अंधारात स्वतःचे अस्तित्व लपवून संशयास्पदरित्या थांबलेला दिसला. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांचे पथकाने त्याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात
घेतले
या कारवाई मध्ये पोलीस निरीक्षक सतिस शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, स्था. मु. अ. शाखा, पोहेकों अरुण पाटील, कुबेर खोत, पोशि .सुरज थोरात, विनायक सुतार, अभिजीत ठाणेकर, सुनिल जाधव, रोहन घरते, स्था.गु. अ. शाखा, पोना.कॅप्टन गुंडपाडे सायबर पोलीस सांगली हे पथक होते.
सदर आरोपीस पुढील तपास, कामी सांगली शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहे.