Breaking : bolt
पक्षांतर प्रकरणातील न्याय निर्णयांवर ठाकरे गटाचा संतापसुनील तटकरे यांच्या रणनीतीमुळे रायगडमध्ये शिवसेनेला धक्का, राजीव साबळे राष्ट्रवादीत दाखलफडणवीस राज्यपालांची भेट घेऊन नवीन धक्का देण्याच्या तयारीत, राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठी घडामोड घडते याचे स्पष्ट संकेतबीएसएनएल कंपनीच्या मोबाईल टॉवरची लाईट गेल्यास रेंज गायबदापोलीतून "एक राखी जवानांसाठी" अभियानाअंतर्गत सीमेवर राख्या रवाना !महाराष्ट्रात निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्यामागे राज - उद्धव युतीच्या घबराटीचं सावट ?अंबानींंच्या बदनामीसाठीचं सीईओ कोल्हापुरात, त्यांचा अटीट्युड आणि एवढी पण भीती बरोबर नाही !समृद्धी महामार्गातील हजारो झाडांच्या कत्तलीत लाखो पशु-पक्षी रस्त्यावर आली, तेव्हा "पेटा" कुठे होती ?वैभववाडी येथील राज्य महामार्गावरील चिखलमय खड्ड्यात फुलणार "आंदोलनाची" हिरवीगार झाडेसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिरोडा येथील विद्युत पोलवर तागंठी तलवार

जाहिरात

 

शासनाची आरोग्य विभागाची खरेदी म्हणजे कायम चर्चेचा विषय का ठरते ? एका जिल्ह्यातील खरेदीची राज्यभर चांगलीच चर्चा

schedule25 May 25 person by visibility 167 categoryक्राइम न्यूज

सुशांत पोवार (विशेष वृत्त) - आरोग्य विभागात खरेदी प्रक्रियेतील अनियमितता आणि गैरव्यवहार नेहमीच चर्चेत असतात. औषध खरेदी, उपकरण खरेदी आणि इतर सेवा खरेदी करताना अनेकवेळा नियम धाडतात आणि भ्रष्टाचार होतो, असा आरोप वारंवार केला जातो. तसाच प्रकार एका जिल्ह्यात झाला असून त्यांनी गेल्या १० वर्षात जितकी आयुर्वेदिक कफ सिरपची ऑर्डर काढली नाही तितकी ऑर्डर प्रथमच चढ्या दराने खरेदी केल्याने त्या जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा विषय राज्यासाठी चर्चेचा विषय झाला आहे.

                  आरोग्य विभागात औषध खरेदी, उपकरण खरेदी आणि इतर सेवा खरेदी करताना अनियमितता आणि भ्रष्टाचार होतात. अनेकदा खासगी कंपन्यांशी गैरव्यवहार करून खरेदी केली जाते, ज्यामुळे सरकारी पैशाचा अपव्यय होतो. काही ठिकाणी, औषध खरेदीत मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याचे समोर आले आहे. एका एजन्सीने टॅब्लेट खरेदी केली, ज्यात कोणाची भागीदारी आहे, याबद्दल सभागृहात मोठा गदारोळ झाला होता. आरोग्य विभागाच्या खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता नसल्यामुळे गैरव्यवहार होण्याची शक्यता वाढते, असा आरोप केला जातो. आरोग्य विभागात खरेदी प्रक्रियेतील अनियमितता आणि गैरव्यवहार नेहमीच चर्चेचा विषय असतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने अधिक कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे. खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करणे आवश्यक आहे.

             राज्यातील एका जिल्ह्यात जिल्हा आरोग्य विभागाने आयुर्वेदिक कफ सिरपची खरेदी केली आहे. सदरची खरेदी त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात केली आहे कि तब्बल मागील १० वर्षात त्यांनी इतका आयुर्वेदिक कफ सिरप मागणी केलेला नाही. त्यासाठी इतकी प्राथमिक आरोग्य केंद्रांनी मागणी केल्याबाबत आता शंका उपस्थित होत आहे. आयुर्वेदिक कफ सिरप तब्बल करोड रुपयांच्या आत बाहेर खरेदी झाल्याने यासाठी निविदा भरण्यासाठी किमान २० ते २५ पुरवठादार येतील अशी अपेक्षा असताना सदर निविदेसाठी त्या जिल्हा आरोग्य विभागाला पुरवठा करणारे मागील जुने पुरवठादार तीन वर्षे झाले बंद झाल्याने त्यांना ब्लॅकलिस्ट केले कि निविदा भरण्यापासून रोखण्यात आले त्यामुळे निविदेबाबत सुद्धा शंका निर्माण होत आहे. ऑलिओपॅथी कफ सिरप सध्या शासनाच्या आरोग्य विभागाने काही जिल्ह्यातील खरेदी पाहिली असता ऑलिओपॅथी कफ सिरपचा दर १५ ते १८ रुपयांच्या आसपास खरेदी झाले आहेत पण ह्या जिल्ह्यातील आरोग्य विभागाने आयुर्वेदिक कफ सिरप ५४ रुपयांच्या आसपासच्या दराने खरेदी झाल्याने हा चढा दर सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि आरोग्य संचालक यांना तक्रारी झाल्या तर घाम फोडणारा ठरणार इतके नक्की. जुने पुरवठादार यांनी त्याच जिल्हा आरोग्य विभागाला १४ ते २० रुपयाने मागील जुनी खरेदी वेळी आयुर्वेदिक कफ सिरपचा पुरवठा केला असल्याचे त्या आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले पण ते जुने पुरवठादार सध्या तीन वर्षात त्या जिल्हा आरोग्य विभागाकडे इतके मोठे टेंडर होऊन पाठ फिरवण्याचे कारण शोधले तर फार मोठा भ्रष्टाचार बाहेर येऊ शकतो. याप्रकरणी लवकरच राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण विभाग संपर्क प्रमुख सुशांत पोवार आवाज उठवणार असून सदर प्रकरणी पुरवठादार यांनी ओपन मार्केटला शासनाला पुरवठा होते त्याच्या किमान ३० टक्के आयुर्वेदिक कफ सिरपचा पुरवठा केला आहे का ? आणि नसल्यास दर निश्चिती आणि दर्जाबाबत आरोग्यमंत्री यांना कारवाई संदर्भात जनआंदोलन उभे करणार असल्याचे वृत्तसंस्थांशी बोलताना सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes