Breaking : bolt
पक्षांतर प्रकरणातील न्याय निर्णयांवर ठाकरे गटाचा संतापसुनील तटकरे यांच्या रणनीतीमुळे रायगडमध्ये शिवसेनेला धक्का, राजीव साबळे राष्ट्रवादीत दाखलफडणवीस राज्यपालांची भेट घेऊन नवीन धक्का देण्याच्या तयारीत, राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठी घडामोड घडते याचे स्पष्ट संकेतबीएसएनएल कंपनीच्या मोबाईल टॉवरची लाईट गेल्यास रेंज गायबदापोलीतून "एक राखी जवानांसाठी" अभियानाअंतर्गत सीमेवर राख्या रवाना !महाराष्ट्रात निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्यामागे राज - उद्धव युतीच्या घबराटीचं सावट ?अंबानींंच्या बदनामीसाठीचं सीईओ कोल्हापुरात, त्यांचा अटीट्युड आणि एवढी पण भीती बरोबर नाही !समृद्धी महामार्गातील हजारो झाडांच्या कत्तलीत लाखो पशु-पक्षी रस्त्यावर आली, तेव्हा "पेटा" कुठे होती ?वैभववाडी येथील राज्य महामार्गावरील चिखलमय खड्ड्यात फुलणार "आंदोलनाची" हिरवीगार झाडेसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिरोडा येथील विद्युत पोलवर तागंठी तलवार

जाहिरात

 

पंचगंगा घाटाची महापालिकेच्यावतीने फायर फारयटद्वारे स्वच्छता

schedule31 Jul 25 person by visibility 24 categoryकोल्हापूर

सुशांत पोवार (कोल्हापूर) - शहरासह जिल्हयामध्ये पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगा नदीचे पाणी पुन्हा पात्रात गेले आहे. जिल्हयामध्ये जोरदार पाऊस होऊन पंचगंगा नदीचे पाणी तिसऱ्यांदा पात्रा बाहेर आले होते. यापुर्वी महापालिकेने फायर फायटरद्वारे या घाट व परिसराची स्वच्छता केली होती. पुन्हा घाटावर पाण्याबरोबर आलेला चिखल संपुर्ण घाटावर पसरला होता. पूराचे पाणी ओसरल्यानंतर चिखलामुळे नागरीकांना घाटावर ये-जा करण्यासाठी अडचण होत होती. त्यामुळे महापालिकेने आज पाणी ओसरल्यानंतर तातडीने या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविली. यावेळी पूराच्या पाण्याबरोबर आलेला चिखल अग्निशमन विभागाच्या फायर फायटरने पाणी मारुन काढण्यात आला. यासाठी 1 फायर फायटर, व 1पाण्याचे टँकरची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी 8 फायरमन, 1 आरोग्य निरिक्षक, 1 मुकादम व सफाई कर्मचा-यांमार्फत सदरचे काम पुर्ण करण्यात आले आहे. सदरची स्वच्छता मोहिमे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

            त्याचबरोबर बोटॅनिकल गार्डनमध्ये आलेला कचरा सफाई कर्मचाऱ्यांमार्फत उठाव करण्यात आला. यामध्ये 2 डंपर इतका कचरा उठाव करण्यात आला. सदरची सफाई 1 आरोग्य निरिक्षक व 12 सफाई कर्मचा-यांमार्फत पुर्ण करण्यात आली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes